वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ६. सार्थ अभंग २५०१ ते ३०००

नामाचा महिमा बोलिलो

🙏 3. संत तुकाराम · ABH-077130 · अभंग क्र. २९३६

2936.
नामाचा महिमा बोलिलो उत्कर्ष । अंगी काही रस न येचि तो ॥१॥
कैसे समाधान राहे पांडुरंगा । न लगेचि अंगा आणी काही ॥धृपद॥
लाभाचिये अंगी सोस कवतुके । फिक्याचे ते फिके वेवसाव ॥२॥
तुका म्हणे करा आपुला महिमा । नका जाऊ धर्मावरी माझ्या ॥३॥

अर्थ :
देवा मी तुमच्या नामाचा महिमा तसेच उत्कर्ष खूप लोकांना सांगितला आहे परंतू तसा रस अनुभव मला काही अजून आला नाही. देवा अहो तुमच्या नामाचा व उत्कर्षाचा अनुभव माझ्या अंगी आलाच नाही तर अंगामध्ये समाधान तरी कसे राहील ? हे देवा अहो जर एखादा व्यवसाय करताना त्या व्यवसायात आपल्याला लाभ झाला तरच त्या व्यवसायाविषयी अधिक अंगी कौतुकही निर्माण होते व त्याचा हव्यासही वाढतो परंतू त्या व्यवसायात लाभ जर झालाच नाही तर तो व्यवसाय फिका ठरतो. तुकाराम महाराज म्हणतात, देवा आता तुम्ही माझ्या धर्मावर माझ्या जातीवर माझ्या अधिकारावर जाऊ नका तर तुमच्या नामाचा महिमा दाखवा आणि माझा उध्दार करा.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग