जाणते नेणते दोघेही ग
2948.
जाणते नेणते दोघेही गुंतती । वाया कुंथाकुंथी करिती रया ॥१॥
प्रपंच व्यसन न चुके पामरा । करती वेरझारा न चुके रया ॥२॥
वोढाळ सांपडता बांधिती दावणी । कोण करुणावचनीं सोडी रया ॥३॥
एका जनार्दनी करिता प्रयाणा । नाही ती करुणा यमासी ॥४॥
