का रे हावभरी जाहालसी
2956.
का रे हावभरी जाहालसी पामरा । भार वाहसी खरा प्रपंचाचा ॥१॥
नाम श्रीरामांचे नित्य घेई वाचे । तुटले जन्माचें दुःख जाण ॥२॥
यातना यमाची दुःखाची परवडी । नामे धरी गोडी आवडीनें ॥३॥
एका जनार्दनी नायकसी मूढा । अहा रे दगड धर्मलंडा ॥४॥
