वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ६. सार्थ अभंग २५०१ ते ३०००

बरवे माझ्या केले मने

🙏 3. संत तुकाराम · ABH-077439 · अभंग क्र. २९४०

2940.
बरवे माझ्या केले मने । पंथे येणे निघाले ॥१॥
अभयाचे जावे ठाया । देवराया प्रतापे ॥धृपद॥
साधनाचा न लगे पाग । अवघे सांग कीर्तन ॥२॥
तुका म्हणे सत्ता थोरी । कोण करी खोळंबा ॥३॥

अर्थ :
माझे मन आता भक्तीपंथाच्या मार्गाने गेले ते त्याने हे खूप चांगले केले आहे. आता देवराया हरी त्याचा प्रताप दाखवील अभया च्या ठिकाणी म्हणजे जेथे कोणत्याही प्रकारचे भय नाही अशा ठिकाणी तो मला त्याच्या समर्थ्याने पोहोचवेल व त्याच्या मदतीने मी तिथे पोहोचले. आता परमार्थ करण्यासाठी केवळ हरीचे कीर्तन हेच मुख्य साधन आहे इतर कोणत्याही साधनांच्या बरोबर जाण्याची गरज राहिली नाही हरीच्या कीर्तनाने सर्वकाही सांग म्हणजे सफल होईल. तुकाराम महाराज म्हणतात हरी ची सत्ता खूप मोठी आहे मग आपण कोणतेही कार्य करत असताना जर त्याची कृपा आशीर्वाद आपल्यावर असेल तर आपल्या कार्‍यात कोण खोळंबा करेल?

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग