सुखरूप चाली । हळूहळू
2917.
सुखरूप चाली । हळूहळू उसंतिली ॥१॥
बाळगोपाळाची वाट । सेवे सेवकता नीट ॥धृपद॥
जरी झाला श्रम । तरी पडो नये भ्रम ॥२॥
तुका म्हणे दासा । देव सरिसा सरिसा ॥३॥
अर्थ :
भक्तीमार्ग हा आमच्या सुखाची वाटचाल आहे तेथे आम्ही हळूहळू पाऊल पुढे टाकत आहोत. भक्तीमार्ग हा आमच्या बालगोपाळांच्या भोळया भक्तांचा मार्ग आहे आणि तेथे सेव्य सेवकता सरळपणा आहे. या मार्गामधे जरी श्रम कष्ट झाले तरी मात्र कोणालाही या मार्गामध्ये भ्रम पडत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, या भक्तीमार्गामधे देव त्याच्या दासांबरोबर सारखा सारखा राहात असतो.
