क्षणभंगुर देह । याचा
2920.
क्षणभंगुर देह । याचा मानिसी संदेह ॥१॥
उदकावरील तरंग । तैसे दिसे सर्व जग ॥२॥
पाहता मृगज्ळा । जळ नोहेची निर्मळा ॥३॥
साउली अभ्राची । वाया जाय जैसी ॥४॥
करिता लवण पुतळा । विरे जैसा मिलतां जळा ॥५॥
एका जनार्दनी तैसे । दिसतां देह नासे जैसे ॥६॥
