वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ६. सार्थ अभंग २५०१ ते ३०००

म्हणउनि शरण जावे । स

🙏 3. संत तुकाराम · ABH-077144 · अभंग क्र. २९६०

2960.
म्हणउनि शरण जावे । सर्वभावे देवासी ॥१॥
तो हा उतरील पार । भवदुस्तरनदीचा ॥धृपद॥
बहु आहे करुणावंत । अनंत हे नाम ज्या ॥२॥
तुका म्हणे साक्षी आले । तरी केले प्रगट ॥३॥

अर्थ :
भवसागरातून तरुन जाण्यासाठी सर्वभावे देवाला शरण जावे. मग हा देव कठीण अशा भवनदीच्या पार आपल्याला उतरवील. ज्याला अनंत असे नाम आहे तो खूपच कृपावंत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, प्रत्यक्ष माझ्या अनुभवाला या गोष्टी आल्या आहेत म्हणूनच तुमच्यासमोर मी या गोष्टी प्रकट केल्या आहेत.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग