आश्वासावे दास । तरी
2949.
आश्वासावे दास । तरी घडे तो विश्वास ॥१॥
नाही चुकत चाकरी । पुट लाडे शोचे थोरी ॥धृपद॥
स्वामीच्या उत्तरे । सुख वाटे अभये करे ॥२॥
न मगे परि भाते । तुका म्हणे निढळ रिते ॥३॥
अर्थ :
देवा तुम्ही तुमच्या दासाला केवळ भिऊ नकोस मी आहे असे आश्वासन जरी दिले तरी तुमच्या दासाला तुमच्याविषयी विश्वास वाटतो. आम्हाला तुम्ही केवळ आश्वासन दिले तरी आमचे म्हणजे तुमच्या लाडक्या भक्तांचे महत्व जगामधे वाढेल आणि आम्ही तुमची सेवा करण्यास कधीही चुकत नाहीत. अहो स्वामीच्या नुसत्या प्रेमाच्या शब्दाने आणि स्वामीच्या अभयहस्त मस्तकावर असल्याने दासाला सुख वाटत असते. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुमची आम्ही जी सेवा करतो त्याच्या बदल्यात आम्हाला तुम्ही काहीतरी दयावे असे आम्ही तुम्हाला तर मागणार नाही परंतू तुम्ही केवळ आम्हाला आश्वासन जरी दिले तरी आम्हाला चांगले वाटेल.
