वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ६. सार्थ अभंग २५०१ ते ३०००

तू माझा कोंवसा । परी

🙏 3. संत तुकाराम · ABH-077182 · अभंग क्र. २९५८

2958.
तू माझा कोंवसा । परी न कळे या धसा ॥१॥
कूट खाती मागे पुढे । जाती निरयगावा पुढे ॥धृपद॥
मज म्हणती कवी । निषेधुनि पापी जेवी ॥२॥
तुका म्हणे पांडुरंगा । आता कोण लेखी जगा ॥३॥

अर्थ :
देवा तू माझा आधार आहेस परंतू या धसाळ लोकांना हे मात्र कळतच नाही. देवा अहो हे लोक माझ्या पुढे किंवा मागे माझी निंदा करतात व निंदारुपी कुट हे लोक खातात याने ते नरकरुपी गावालाच पुढे नक्की जातील. हे पापी लोक माझा निषेध करुन मला कवी असे म्हणून माझी निंदा करतात. तुकाराम महाराज म्हणतात, हे पाडूरंगा आता या जगाची कोण लेखी करते यांच्याशी मला काहीही एक कर्तव्य नाही.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग