वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ६. सार्थ अभंग २५०१ ते ३०००

आळिकरा कोठे साहाते क

🙏 3. संत तुकाराम · ABH-077112 · अभंग क्र. २९४३

2943.

आळिकरा कोठे साहाते कठिण । आपुला ते प्राण देऊ पाहे ॥१॥
सांभाळावे मायबापे कृपादृष्टी । पीडिता तो दृष्टी देखो नये ॥धृपद॥
अंतरलो मागे संवसारा हाती । पायापे सरती झालो नाही ॥२॥
तुका म्हणे तुम्ही विचारा जी देवा । ठेवाल ते ठेवा कोणी परी ॥३॥

अर्थ :
हट्टी मुलाला आईचे कठोर वागणे कुठे सहन होत असते का तो रडून रडून आपले प्राण देखील देण्यास घाबरत नाही त्यामुळे मायबापाने आपल्या मुलाचा सांभाळ कृपादृष्टीने करावा त्या मुलाला पीडा झालेली देखील दृष्टीने त्यांनी पाहू नये. देवा मी तुमच्या प्राप्तीसाठी संसाराला हातातून सोडून संसारापासून अंतरलो तरी मी तुमच्या पायाजवळ सरता झालो नाही. तुकाराम महाराज म्हणतात, देवा अहो तुम्ही माझ्याविषयी थोडा विचार करा आणि मग तुम्हाला मला कसे ठेवायचे असेल तसे ठेवा.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग