वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ६. सार्थ अभंग २५०१ ते ३०००

असाल ते तुम्ही असा ।

🙏 3. संत तुकाराम · ABH-077172 · अभंग क्र. २९५५

2955.
असाल ते तुम्ही असा । आम्ही सहसा निवडो ना ॥१॥
अनुसरलो एका चित्ते । हातोंहाते गींवसित ॥धृपद॥
गुणदोष काशासाठी । तुमचे पोटी वागवू ॥२॥
तुका म्हणे दुजे आता । कोठे चित्ता आतळो ॥३॥

अर्थ :
हे लोकांनो तुम्ही जसे असाल तसे असाल आम्ही तुमच्यामधील गुणदोष कधीही निवडणार नाही. देवाला आम्ही हातोहात शोधीत गेलो व एकचित्ताने त्याला अनुसरलो आहोत. अहो तुमचे गुणदोष मी माझ्या पोटामध्ये का वाहवत बसलो ? तुकाराम महाराज म्हणतात, आता आमच्या चित्ताने व्दैताच्या ठिकाणी कोठे स्पर्श करत बसावा ?

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग