वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ६. सार्थ अभंग २५०१ ते ३०००

देवाचे चरित्र नाठवे

🙏 3. संत तुकाराम · ABH-077189 · अभंग क्र. २९१३

2913.
देवाचे चरित्र नाठवे सर्वथा । विनोदार्थ कथा गोड वाटे ॥१॥
हातावरी हात हासोनि आफळी । वाजविता टाळी लाज वाटे ॥२॥
तुका म्हणे थुंका त्याच्या तोंडावरी । जातो यमपुरी भोगावया ॥३॥

अर्थ :
परमार्थामध्ये क्षुद्र असणाऱ्या लोकांना देवाचे चरित्र कधीच आवडत नाही परंतू विनोदाच्या गप्पागोष्टी त्यांना फार आवडतात. विनोदाच्या गोष्टी करतांना ते हातावर हात देऊन मोठया आनंदाने टाळी देऊन मोठ मोठयाने हसत असतात परंतू हरीकथेमध्ये टाळी वाजताना त्यांना लाज वाटते. तुकाराम महाराज म्हणतात, अशा मनुष्याच्या तोंडावर थुंका तो आपल्या कर्माने निश्चिंतच यमपुरी भोगायला जात असतो.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग