न पडो आता हाडी घाव ।
2953.
न पडो आता हाडी घाव । मध्ये कीव नासक ॥१॥
करविली आत्महत्या । जीवा का द्वंदाच्या ॥धृपद॥
आशापाशी गुंतला गळा । तेणे कळाहीन झालो ॥२॥
तुका म्हणे लावू मुळी । जीवकुळी थारेसी ॥३॥
अर्थ :
आता माझ्या देहावर अहंकाराचा घाव पडू नये कारण माझ्यामध्ये जे करुणतेचे गुण आहेत ते नाश पावेल. माझ्या जीवाच्या ठिकाणी अनेक प्रकारचे व्दंव्द निर्माण होते ते केवळ अभिमानामुळे व त्यामुळे माझ्या आत्मसुखाचा नाश होतो त्यामुळेच आत्महत्या केल्यासारखे होते. आशा पाशाच्या ठिकाणी माझा गळा गुंतलेला आहे त्यामुळे मी अतिशय कळाहीन दीन झालो आहे. तुकाराम महाराज म्हणतात, जे मूळ आहे त्या मूळाच्या ठिकाणीच आत्मस्वरुपाच्या ठिकाणीच आता स्थान निश्चिंत करायचे आहे.
