म्हणउनि झाली तुटी ।
2952.
म्हणउनि झाली तुटी । नाही भेटी अहंकारे ॥१॥
दाखविले देवे वर्म । अवघा भ्रम नासला ॥धृपद॥
हाते मुरगाळिता कान । नाही भिन्न वेदना ॥२॥
तुका म्हणे एकातसुखे । अवघी गोते गुंतले ॥३॥
अर्थ :
अहंकारच माझ्या ठिकाणी राहिला नाही त्यामुळेच संसाराचा निरास झाला आहे. देवाने मला परमार्थ करण्याचे खरे वर्म दाखविले त्यामुळे माझा सर्व भ्रमच नाहीसा झाला आहे. आपल्याच हाताने आपण आपला कान पिरगळून घेतला तर आपल्याला वेदना होतीलच. तुकाराम महाराज म्हणतात, जर आपल्याला असे एकातसुख प्राप्त झाले तर सर्व गणगोत आपल्यामध्येच गुंततात.
