वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ६. सार्थ अभंग २५०१ ते ३०००

हेचि वारंवार । पडताळ

🙏 3. संत तुकाराम · ABH-077362 · अभंग क्र. २९३७

2937.
हेचि वारंवार । पडताळुनी उत्तर ॥१॥
करितो पायासी विनंती । नुपेक्षावे कमळापती ॥धृपद॥
गंगोदके गंगे । अर्घ्य द्यावे पांडुरंगे ॥२॥
जोडोनिया हात । करी तुका प्रणिपात ॥३॥

अर्थ :
अहो देवा मी सारखे सारखे तेच बोलणे पडताळून पाहून तुमच्याशी बोलत आहे व तुमचे लक्ष वेधून घेत आहे. हे कमळापती मी तुमच्या पायाजवळ हीच विनंती करीत आहे की माझी तुम्ही उपेक्षा करु नका. हे पाडूरंगे जसे गंगेचे पाणी घेऊन गंगेलाच अर्ध्य दयावे त्याप्रमाणे मी तुमचेच बोलणे घेऊन तुम्हालाच ते समर्पित करीत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा मी हात जोडून तुम्हाला प्रणिपात करीत आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग