वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ६. सार्थ अभंग २५०१ ते ३०००

आता देवा मोकलीले । त

🙏 3. संत तुकाराम · ABH-077378 · अभंग क्र. २९२९

2929.
आता देवा मोकलीले । तुम्ही भले दिसेना ॥१॥
आता नाही जीवभाव । उरला ठाव वेगळा ॥धृपद॥
सांभाळुन घ्यावे देवा । आपणासवा यावरी ॥२॥
तुका म्हणे नग्न भाज । तरि ते लाज स्वामीसी ॥३॥

अर्थ :
देवा तुम्ही आता मला मोकाट सोडले आहे परंतू हे तुमच्यासाठी चांगले दिसत नाही. आता माझ्या जीवाभावाचे दुसरे वेगळे कोणते ठिकाण राहिले नाही. देवा तुम्ही माझा स्वीकार करा आणि हा आपलाच आहे असे समजून माझा सांभाळ करा. तुकाराम महाराज म्हणतात, देवा जर एखादया व्यक्तीची बायको नग्न अवस्थेत बाहेर पडली तर त्याची सर्वस्वी लाज तिच्या पतीला वाटते अगदी त्याप्रमाणेच आपल्या दोघाचे संबंध आहेत.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग