भासतसे दोर विखाराचे
2945.
भासतसे दोर विखाराचे परी । तैसीच थोरी प्रपंचाची ॥१॥
भुलले भुलले प्रपंची गुंतले । वाया उगले बोल का हे ॥२॥
श्वानाचियेपरी मागे पुढे पाहे । माझा म्हणोनी बाह्मा कवटाळिती ॥३॥
एका जनार्दने अवकाळीं मेघ । तैसा प्रपंची दंभ लटिकाची ॥४॥
