वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ६. सार्थ अभंग २५०१ ते ३०००

आपणचि व्हाल साहे । क

🙏 3. संत तुकाराम · ABH-077163 · अभंग क्र. २९४७

2947.
आपणचि व्हाल साहे । कार्य आहे निर्वाणीचे ॥१॥
भाकिली ते उरली कीव । आहे जीव जीवपणे ॥धृपद॥
आहाच कैचा बीजा मोड । प्रीति कोड वाचूनि ॥२॥
तुका म्हणे दंडिन काया । याल तया धावणिया ॥३॥

अर्थ :
देवा मी निर्वाणीचे कार्य हाती घेतले आहे तरी त्यावेळ प्रसंगी तुम्ही मला साह्य व्हाल. देवा यापूर्वी मी तुम्हाला खूप करुणा भाकली परंतू माझी उरली आहे ती केवळ करुणाच, अहो माझा जीव अजूनही जीवदशेतच आहे. अहो देवा नुसते वरच्या वर बीज ठेवले तर त्याला मोड कसे फुटेल त्याप्रमाणेच तुमचे माझ्यावर प्रेमच नसले तर माझी इच्छा तरी कशी पूर्ण होणार आहे ? तुकाराम महाराज म्हणतात, देवा आता मी माझ्या शरीराला दंड करील त्रास करुन घेईन त्यामुळे तरी तुम्ही माझ्याकडे धावत याल.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग