वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ६. सार्थ अभंग २५०१ ते ३०००

स्वप्नींचे हे धन हात

🙏 3. संत तुकाराम · ABH-077217 · अभंग क्र. २९४४

2944.
स्वप्नींचे हे धन हाती ना पदरी । प्रत्यक्ष का हरी होऊ नये ॥१॥
आजुनि का करा चाळवाचाळवी । सावकाशे द्यावी सत्य भेटी ॥धृपद॥
बोलोनिया फेडा जीवींची काजळी । पाहेन कोवळी चरणांबुजे ॥२॥
तुका म्हणे माझ्या जीवींचिया जीवा । सारूनिया ठेवा पडदा आता ॥३॥

अर्थ :
अहो हरी स्वप्नातले धन हे हातात नाही पडत व पदरातही पडत नाही त्याप्रमाणे तुम्ही आम्हाला तुमचा अनुभव देण्यापेक्षा प्रत्यक्ष भेटच का देत नाही ? देवा मला तुमच्या सगुण स्वरुपाविषयी पूर्ण माहिती झाली आहे त्यामुळे तुम्ही अजून देखील माझी फसवाफसवी का करता तुम्ही मला सावकाश का होईना परंतू तुमच्या सगुण स्वरुपाचे सत्य दर्शन दयावे. देवा तुम्ही मला तुमच्याजवळ बोलवून माझ्या जीवाची काजळीरुपी किल्मिश दूर करा मग मी तुमची कोवळी चरणकमळे प्रत्यक्ष माझ्या डोळयाने पाहीन. तुकाराम महाराज म्हणतात, हे माझ्या जीवाच्या जीवना आता आपल्या दोघाच्यामधील भेदाचा पडदा तुम्ही सारुन ठेवा.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग