वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ६. सार्थ अभंग २५०१ ते ३०००

राहे उभा वादावादी ।

🙏 3. संत तुकाराम · ABH-077048 · अभंग क्र. २९५१

2951.
राहे उभा वादावादी । तरी फंदी सापडे ॥१॥
लव्हाळ्यासी कोठे बळ । करिल जळ आपुले ॥धृपद॥
कठिणासी बलजोडा । नम्र पीडा देखेना ॥२॥
तुका म्हणे सर्वरसी । मिळे त्यासी गोत ते ॥३॥

अर्थ :
जो नेहमी वादावाद करण्यासाठी उभाच असतो तो कधीना कधी अडचणीत सापडतो. लव्हाळयामध्ये कुठे बळ आहे काय परंतू कितीही पाण्याचा प्रवाह असला तरी त्या पाण्याच्या प्रवाहापुढे ते नम्र होते व पाण्याला आपलेसे करते. जो कोणी वादविवाद करण्यासाठी नेहमी तत्पर असतो त्याला कोणीना कोणी कधी ना कधी त्याच्यासारखा भेटतोच व तो त्याला दु:ख देतोच परंतू जो नम्र आहे तो सर्वांपुढे नम्र असतो त्यामुळे त्याला कधीही दु:ख दिसतच नाही. तुकाराम महाराज म्हणतात, जो सर्वाशी समरस होऊन वागतो त्याचे सर्व जग गणगोत होते.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग