बहु फिरलो ठायाठाव ।
2926.
बहु फिरलो ठायाठाव । कोठे भाव पुरेचि ना ॥१॥
समाधान तो पावलो । उरलो बोलो यावरी ॥धृपद॥
घे गा देवा आशीर्वाद । आमुच्या नांद भाग्याने ॥२॥
तुका म्हणे जेवू आधी । खवखव मधी सारावी ॥३॥
अर्थ :
देवा मी खूप ठिकाणी फिरलो परंतू माझे समाधान कोठेही झाले नाही. परंतू मी तुझ्याजवळ आलो आणि समाधानी झालो आता मी केवळ बोलण्यापुरताच उरलो आहे. देवा तू आमचा आर्शिवाद घे आणि आमच्या आशिर्वादाने तू सुखाने नांद. तुकाराम महाराज म्हणतात, आता बाकीच्या सर्व गोष्टी बाजूला सारुन टाक आता खूप भूक लागली आहे त्यामुळे आपण दोघेही ऐक्यरसाचे जेवण जेऊ.
