न पवीजे तया ठाया । आ
2925.
न पवीजे तया ठाया । आलो कायाक्लेशेसी ॥१॥
आता माझे आणी मना । नारायणा ओजेचे ॥धृपद॥
बहु रिणे पिडिलो फार । परिहार करावा ॥२॥
तुका म्हणे निर्बळशक्ति । काकुलती म्हुण येतो ॥३॥
अर्थ :
मी माझ्या शरीराला खूप त्रास देत आलो आहे देवा तरी देखील मला तुमच्याजवळ जागा मिळत नाही. हे नारायणा आता माझे हित करण्याविषयी तुम्ही तुमच्या मनामध्ये आणा. मी पाप पुण्याच्या ऋणाने फार पिडीत झालो आहे त्यातून आता तुम्हीच माझा परीहार म्हणजे निवारण करावे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा मी निर्मळ आहे शक्तीहीन आहे म्हणून तर तुम्हाला काकूळतीला येतो आहे.
