नाशिवंत देह नाशिवंत
2919.
नाशिवंत देह नाशिवंत माया । नाशिवंत छाया वाया जैशी ॥१॥
म्रुगजळाचे परी नाशिवंत धन । यासी तुं भुलुन गुंतलासी ॥२॥
व्यापारी बाजारीं घातिले दुकान । स्ती पुत्र स्वजन तैसे बापा ॥३॥
एका जनार्दनी ऐशियाच्या छंद । भुलोनी गोविंदा विसरसी ॥४॥
