बाळ तरुण वृद्ध ऐसे त
2947.
बाळ तरुण वृद्ध ऐसे ते पाहिले । पाहुनी निमाले देखसी रया ॥१॥
प्रपंच काबाड कोंबड्याचे परी । पुढेंचि उकरी लाभ नाही ॥२॥
तुज सुख दुःख मागील आठव । आता भाकी कींव कांही रया ॥३॥
एका जनार्दनी अहा रांदलेका । भोगिसी अनेका योनी रया ॥४॥
