वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ६. सार्थ अभंग २५०१ ते ३०००

म्हणउनि काय जीऊ भक्त

🙏 3. संत तुकाराम · ABH-077061 · अभंग क्र. २९४६

2946.
म्हणउनि काय जीऊ भक्तपण । जायाची भूषणे अळंकार ॥१॥
आपुल्या कष्टाची करूनिया जोडी । मिरवीन उघडी इच्छावसे ॥धृपद॥
तुके तरि तुके खऱ्याचे उत्तम । मुलाम्याच्या भ्रम कोठवरी ॥२॥
तुका म्हणे पुढे आणि मागे फांस । पावे ऐसा नास न करी देवा ॥३॥

अर्थ :
अंत:करणात भक्ती नाही आणि केवळ भक्तपणा दाखवून जगून काय उपयोग आहे दुसऱ्याचे अलंकार आपलीच आहे हे सांगून काय होणार आहे ? देवा मी माझ्या कष्टाने तुझी प्राप्ती करुन घेईन आणि मग माझ्या इच्छेने उघड उघड माझा भक्तपणा सर्वत्र मिरवीन. खऱ्या सोन्याच्या बरोबरीला उत्तम प्रकारच्या वस्तूच बरोबरीला उतरतात परंतू सोन्याचा मुलामा दिलेल्या खोटया धातूचा भ्रम कोठपर्यंत टिकेल ? तुकाराम महाराज म्हणतात, देवा मी मागे आणि पुढे जन्ममरणाच्या पाषात सापडेन अशा प्रकारचा स्वत:चा नाश कधीच करुन घेणार नाही.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग