वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ६. सार्थ अभंग २५०१ ते ३०००

आता येणे पडिपाडे । र

🙏 3. संत तुकाराम · ABH-077069 · अभंग क्र. २९२४

2924.
आता येणे पडिपाडे । रस सेवू हा निवाडे । मुंगी नेली गोडे । ठेविलिये अडचणी ॥१॥
तैसे होय माझ्या जीवा । चरण न सोडी केशवा । विषयबुद्धी हेवा । वोस पडो सकळ ॥धृपद॥
भुकेलिया श्वाना । गांठ पडे सवे अन्ना । मुको पाहे प्राणा । परि तोंडिंची न सोडी ॥२॥
काय जिंकियेले मन । जीवित्व कामातुरा तृण । मागे विभिचारिण । भक्ती तुका ये जाती ॥३॥

अर्थ :
आम्ही परमार्थरस कितीही अडचणीत असला तरी तो सेवन करु. जसा गोड पदार्थ कितीही अडचणीत ठेवला तरी तेथे जातेच अगदी त्याप्रमाणे आम्ही परमार्थरस कितीही अडचणीत असला तरी मुंगी तो पदार्थ सेवन करते. हे माझ्या जीवा अगदी त्या मुंगीप्रमाणे तू होय आणि केशवाचे चरण कधीही सोडू नको आणि विषयाचा हेवा करणारी माझी बुध्दी नेहमी सर्वकाळ ओस पडो. भुकेला कुत्रा असावा आणि त्याला अन्न मिळावे, तर तो कुत्रा एकवेळ प्राण सोडून देईल परंतू तोंडातले कधीही सोडणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, अहो कामातूर झालेल्या मनुष्याने आपले मन कधी जिंकले आहे काय आपला जीव देखील कामवासनेपुढे तो गवताप्रमाणे मानतो. व्याभिचारी स्त्रीचा भोग घेण्याकरता तो तिच्या मागे मागे फिरत असतो अगदी त्याच जातीची माझी भक्ती आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग