मंगळाचा मंगळ साटा ।
2935.
मंगळाचा मंगळ साटा । विट तोटा नेणे ते ॥१॥
हे भरा साते आले । भले भले म्हणवावे ॥धृपद॥
जनी जनार्दन वसे । येथे दिसे ते शुद्ध ॥२॥
तुका म्हणे बहुता मुखे । खरे सुखे ठेवावे ॥३॥
अर्थ :
मंगळाकडे नेहमी मंगळ गोष्टींचा साठा असतो त्यामुळे ते कधीही वीट आणि नुकसान जाणत नाही. त्यामुळे या त्रिभूवनामधे जे मंगळ आहे ते हरीचे नाम आहे ते हरीरामरुपी मंगल माल तुम्ही भरुन घ्या आणि संताकडून भले भले असे म्हणून घ्यावे. एकदा की तुम्ही हरीनामरुपी मंगल माल भरुन घेतला की मग जगामधे जनार्दन कसा वसलेला आहे हे दिसून येईल. तुकाराम महाराज म्हणतात, अनेक संतांच्या मुखातून जे खरे हरीनामरुपी मंगल नाम आले आहे ते सुखाने आपल्याजवळ साठवून ठेवावे.
