नाशिवंत देह नाशिवंत
2917.
नाशिवंत देह नाशिवंत माया । नाशिवंत काया काया काज ॥१॥
यमाचा पाहुणा जाणार जाणार । काय उपचार करुनी वाया ॥२॥
छायेसी बैसला सवेंची तो गेला । वृक्ष रडूं लागला गेला म्हणोनी ॥३॥
पाथस्थ मार्गस्थ येऊनी राहिला । उदय होता निघाला आपुल्या मार्गे ॥४॥
तो घरधनीं रडत धावें मागे । काय काज वेगे सांगा तुम्ही ॥५॥
उसनें आणीतां सुख वाटे जीवा । देता दुःख जीवा काय काज ॥६॥
पाहुणा हा देह जाईल टाकुनी । एका जनार्दनी काय दुःख ॥७॥
