मागे पुढे नाही । दुज
2941.
मागे पुढे नाही । दुजे यावेगळे काही ॥१॥
नाही उरले आणीक । केला झाडा सकळिक ॥धृपद॥
विश्वासावाचून । नावे दुजियाचे शून्य ॥२॥
तुका म्हणे काही । बोलायची उरी नाही ॥३॥
अर्थ :
देवावाचून माझ्या मागेपुढे दुसरे वेगळे असे काहीच नाही. देवावाचून माझ्या मागेपुढे दुसरे काहीही उरले नाही मी सर्व गोष्टींचा झाडा म्हणजे बाद केला आहे. माझा एक देवावाचून दुसरा कोणावरही विश्वास नाही देवावाचून मी दुसऱ्या सर्व गोष्टींवर शून्य घातला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आता देवावाचून इतर काहीही बोलायचे उरलेले नाही.
