वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ६. सार्थ अभंग २५०१ ते ३०००

नाही गुणदोष लिंपो दे

🙏 3. संत तुकाराम · ABH-077356 · अभंग क्र. २९२३

2923.
नाही गुणदोष लिंपो देत अंगी । झाडिता प्रसंगी वरावरी ॥१॥
निकटवासिया आळवितो धावा । येथूनिया देवा सोडवूनी ॥धृपद॥
उमटे अंतरी ते करू प्रगट । कळोनी बोभाट धाव घाली ॥२॥
तुका म्हणे तरि वांचलो या काळे । समर्थाचे बळे सुखी असो ॥३॥

अर्थ :
मी लोकांचे कोणतेही गुणदोष माझ्या अंगाला लागू देत नाही जरी प्रसंगी मला ते लक्षात आले तरी मी वरच्यावर लगेच ते बाजूला टाकून देत असतो. देवा मला माहित आहे तू माझ्या निकटच वास करीत आहे त्यामुळे मी तुला आळवीतो आहे तुला मी हाक मारली की तू लगेच धावून ये आणि मला यातून सोडव. जे आमच्या अंत:करणात उमटते तेच आम्ही देवाजवळ प्रकट करतो आणि त्याचा बोभाटा झाला की ते देवाला कळते आणि तो आमच्याकडे धाव घालत असतो. तुकाराम महाराज म्हणतात, कोणताही प्रसंग असो आम्ही काळाच्या तडाख्यातून वाचतो कारण आम्ही समर्थाची लेकरे आहोत व त्याच्या बळानेच आम्ही नेहमी सुखी आहोत.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग