नवल देखिले संसाराचें
2958.
नवल देखिले संसाराचेंक बंड । त्याचे कोणी तोंड न ठेचिती ॥१॥
गुंतलेचि बळे चिखले माखलें । कर्मा जन्मफळें भोगिताती ॥२॥
नाथिला पसारा मानिती वो साचा । वेध तो तयाचा वागविती ॥३॥
एका जनार्दनी नाडलेसे मोहे । संदेह संदेह गोवियलें ॥४॥
