वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ६. सार्थ अभंग २५०१ ते ३०००

निश्चिंतीने होतो करु

🙏 3. संत तुकाराम · ABH-077327 · अभंग क्र. २९४८

2948.
निश्चिंतीने होतो करुनिया सेवा । का जी मन देवा उद्वेगिले ॥१॥
अनंत उठती चित्ताचे तरंग । करावा हा त्याग वाटतसे ॥धृपद॥
कोण तुम्हाविण मनाचा चाळक । दुजे सांगा एक नारायणा ॥२॥
तुका म्हणे माझा मांडिला विनोद । करऊ नेणे छंद कराल काइ ॥३॥

अर्थ :
देवा मी निश्चिंतपणाने तुमची सेवा करत होतो परंतू तुम्ही माझ्या मनाला का दु:खी केले ? अहो देवा त्यामुळे अंतरंगामधे अनेक प्रकारच्या विकाराचे तरंग उठतात आणि तुमच्या सेवेचा त्याग करावा असे वाटते. हे नारायणा अहो तुमच्यावाचून माझ्या मनाचा दुसरा कोण चालक आहे काय ते तुम्हीच सांगा. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुम्ही माझी चांगलीच थट्टा विनोद मांडला आहे परंतू मला तुमचा छंद कसा करावा हेच समजत नाही त्याला तुम्ही तरी काय करताल.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग