चुकली ते वाट । पुढे
2918.
चुकली ते वाट । पुढे सांपडवी नीट ॥१॥
म्हणउनी गर्भवास । नेणती ते हरीचे दास ॥धृपद॥
संचिताचा संग । काय जाणो पावे भंग ॥२॥
तुका म्हणे दृष्टी । उघडितो नव्हे कष्टी ॥३॥
अर्थ :
काही भक्त सुरुतीला परमार्थातील वाट चुकले परंतु पुढे त्यांना नामसंकीर्तनाची चांगली वाट सापडली. त्यामुळेच तर हरीचे दास गर्भवास म्हणजे काय आहे ते जाणत नाही. त्यांच्या पूर्वसंचितांचा संबंधही आता भंग झाला की काय काय माहित. तुकाराम महाराज म्हणतात, ज्याची ज्ञानदृष्टी उघडी आहे तो कधीही कष्टी होत नाही.
