ऐशी प्रपंचाची गोडी ।
2949.
ऐशी प्रपंचाची गोडी । जन्ममरण घेती कोडी ॥१॥
नाही तया कांही धाक । जन्ममरणाचा देख ॥२॥
आलिया देहासी । नाठविती हृदयस्थासी ॥३॥
जरा आलिया निकटी । करी प्रपंचाची राहटी ॥४॥
एका जनार्दनी शरण । नायकती मूर्ख जन ॥५॥