का रे भांबावसी नास्त
2925.
का रे भांबावसी नास्तिकासाठीं । कोरडी का आटी करसी वाया ॥१॥
हे तो पोसणे आणिले उसणे । जयाचे तया देणे अनायासें ॥२॥
'घ्यावें त्याचे द्यावे' ऐशी आहे नीत । तू रे दुश्चित वाउगा मनी ॥३॥
न देता उरी देणे आहे केव्हा । वाउगा तो हेवा धरती पोटी ॥४॥
एका जनार्दनी भरता मापोडी । पडतसे उडी खालीं मग ॥५॥
