मिळती सख्या माया बहि
2929.
मिळती सख्या माया बहिणी । हाती घेउनी तेजफणी ॥१॥
जंव आहे शरीर चांग । तंव काढिताती चांग भांग ॥२॥
नासिल्या शरीरांतें । टाकिताती तया परते ॥३॥
पहा देही देव असता । नाही म्हणती सर्वथा ॥४॥
एका जनार्दनी पंचत्व । मग म्हणती भूतभुत ॥५॥
