वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 107. कथेकरी - अभंग २६७७ ते २८०८

जप जाप्य तप नको अनुष

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086996 · अभंग क्र. २८०३

2803.
जप जाप्य तप नको अनुष्ठान । पंचाग्नि साधन नको ॥१॥
नको तीर्थाटन नको मंत्रावळी । वेदशास्त्र जाळीं गुंतु नको ॥२॥
नको आत्मस्थिती नको ब्रह्माज्ञान । नको अष्टांग साधन नको वाया ॥३॥
नको यंत्रमंत्र नको रे कल्पना । भ्रांती भूली जाणा नको नको ॥४॥
नको तू करू सायास धरी पा विश्वास । एका जनार्दनी पाहे डोळा ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग