वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ६. सार्थ अभंग २५०१ ते ३०००

डगमगी मन निराशेच्या

🙏 3. संत तुकाराम · ABH-077167 · अभंग क्र. २७६१

2761.
डगमगी मन निराशेच्या गुणे । हे तो नारायणे शांतवीजे ॥१॥
धीर तू गंभीर जीवन जगाचे । जळो विभागाचे आहाचते ॥धृपद॥
भेईल जीव हे देखोनि कठिण । केला जातो सीण तो तो वाया ॥२॥
तुका म्हणे आवश्यक हे वचन । पाळावेचि दान समयो आहे ॥३॥

अर्थ :
हे नारायणा तू आमच्या इच्छा पूर्ण केल्या नाहीस आमचे म्हणणे ऐकले नाहीस तर निराशेने आमचे मन डगमगेल ते मन डगमगू नये त्यामुळे तू त्याला शांत कर. देवा तू धैर्यवान आहेस गंभीर आहेस जगाचे जीवन आहेस परंतू आमच्या विभागाला तुझी भक्ती करण्याचे आले आहे परंतू त्यातही आम्ही सोंग आणतो आहे व आमच्या अशा वागण्याला आग लागो. देवा तुमचे असे हे कठीण वागणे पाहून माझा जीव भीत आहे कारण भक्ताने भक्तीमार्गामध्ये केलेले विविध प्रकारचे कठीण श्रम हे वाया जातात की काय असेच मला वाटत आहे. तुकाराम महाराज म्हणतात. देवा तुम्ही गीतेमध्ये जे तुमचे वचन सांगितले आहे ते पाळण्याची तुम्हाला आवश्यकता आहे आणि मला दान देण्याची हीच योग्य वेळ आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग