सबराभरित देव असोनी ज
2777.
सबराभरित देव असोनी जवळी । व्यर्थ ते कवळी मृत्तिका जळ ॥१॥
ज्याचीया सत्तेचा पंचभुत खेळ । विसरती गोपाळ तयालागीं ॥२॥
वल्कलें वेष्टन भस्माचें धारण । करिती धूम्रपान वाउगेंचीं ॥३॥
एका जनार्दने हृदयस्थ असता । का हो शीण तत्त्वता करिताती ॥४॥
