आपण तो असा । समर्थ ज
2763.
आपण तो असा । समर्थ जी हृषीकेशा ॥१॥
करा करा बुझावणी । काय विलंब वचनी ॥धृपद॥
हेंगे ऐसे म्हणा । उठूनि लागेन चरणा ॥२॥
घेऊनिया सुखे । नाचेल तुका कवतुके ॥३॥
अर्थ :
हे ऋषीकेशा आपण तर समर्थच आहात. मग तुम्ही माझ्या मनाचे समाधान करा ना माझ्याशी बोलण्यासाठी तुम्ही एवढा विलंब का लावत आहात ? हे ऋषीकेशा तुम्ही तुमचे मन मोठे करुन मला दान देताना केवळ असे म्हणा तू हे मागितले आहेस ना, हे घे मग मी उठून लगेच तुमच्या चरणाला लागेन. तुकाराम महाराज म्हणतात, मग तुम्ही मला ते दिले की मी ते सुखाने घेईन व तुमच्यापुढे कौतुकाने नाचेन.
