कलत्रपुत्रबाधा अभिमा
2775.
कलत्रपुत्रबाधा अभिमानाची । तेही त्याजिल्या शेखी त्यागी म्हणे निजाची ॥१॥
अभिमान कैसेनि सरे । ही कृपा कीजे माहेरे दातारा ॥२॥
देही देहातीत प्रतिपादिजे ज्ञान । तेणेंचि ज्ञान देही येतुसे अभिमान ॥३॥
जे जे होय रुतें ते अहंकारु । त्यागी भोगी होय दिंगबरु ॥४॥
ब्रह्माज्ञानें म्हणती अभिमानाची तुटी । सोऽहं सोऽहं म्हणोनी तेथेंही लागे पाठी ॥५॥
द्वैत नाही जगी मीच येकला येकु । येणे स्फुरणें आला अभिमान घातकु ॥६॥
अति सुक्ष्म अभिमान कवणा न पडे ठाई । देहातीत ज्ञानी म्हणती जो विदेही ॥७॥
एका जनार्दनी जगद्गुरु न्याहाळी । गौखुर वंदितां अभिमानाची धुळी ॥८॥
