वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 107. कथेकरी - अभंग २६७७ ते २८०८

अकळ तो खेळ नाकळे वेद

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086992 · अभंग क्र. २७७२

2772.
अकळ तो खेळ नाकळे वेदांतीं । वाउले कुंथती भारवाही ॥१॥
ऐसा तो अकळ न कळेची कळा । लावियेला चाळा सर्व जीवा ॥२॥
परस्परें एकएका पै मैत्री । ऐशी चाले धात्री पंचभुते ॥३॥
जगपटतंतु आपणचि होय । ऐसा हा निश्चय सत्ता ज्याची ॥४॥
एका जनार्दनी सर्वसत्ताधारी । न माय चराचरी कीर्ति ज्याची ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग