ब्रीद ज्याचे जगदानी
2794.
ब्रीद ज्याचे जगदानी । तोचि मनी स्मरावा ॥१॥
सम पाय कर कटी । उभा तटी भींवरेच्या ॥धृपद॥
पाहिलिया वेध लावी । बैसे जीवी जडोनि ॥२॥
तुका म्हणे भक्तिकाजा । धावे लाजा लवलाहे ॥३॥
अर्थ :
जगाला दान देणे हे ज्याचे ब्रीद आहे त्याचेच मनात स्मरण करावे. असा तो श्रीविठ्ठल आपले दोन्हीही पाय समान ठेवून विटेवर आपले दोन्हीही कर कटेवर ठेवून चंद्रभागेच्या तीरावर उभा आहे. ज्याला पाहिल्यानंतर त्याचे रुपाचे लगेच तो आपल्याला वेध लावतो आणि जीवामध्ये जडून बसतो. तुकाराम महाराज म्हणतात, आणि भक्तांच्या कामाकरता तो श्रीविठ्ठल सर्व लज्जा सोडून तात्काळ भक्तांकडे धावत जात असतो.
