उपाधि या नांव भूतांच
2795.
उपाधि या नांव भूतांचा तो द्वेष । तो तू या निःशेष सांडीं बापा ॥१॥
सर्वांठायीं देव जगी तो भरला । व्यापूनियां ठेला जळीं स्थळीं ॥२॥
काम अकाम सकाम निष्काम । हे सोपे उपाय साधकांसी ॥३॥
आसन ध्यान धारण ते ध्येय । हे सोपे उपाय साधकांसी ॥४॥
दंडन मुंडन नको तीर्थाटन । एका जनार्दन हृदयी धरी ॥५॥
