वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 107. कथेकरी - अभंग २६७७ ते २८०८

एक नरदेह नेणोनि वाया

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086995 · अभंग क्र. २७६२

2762.
एक नरदेह नेणोनि वाया गेले । एक न ठके म्हणोनि उपेक्षिले । एक ते गिळले ज्ञान गर्वे ॥१॥
एक ते साधनी ठकिले । एक ते करू करु म्हणतांचि गेले । करणे राहिलेंसे तैसे ॥२॥
यापरि अभिमान जगी । ठकवितसे अंगसंगीं । नडी लागवेगीं जाणत्यासी ॥३॥
जे जे करी साधन । तेथे होय अभिमान । नागवी लावणें तेथे । सावधांवा करी कोण ॥४॥
ज्ञाने व्हावी ब्रह्मप्राप्ती । ते ज्ञान वेची विषयासक्तीं । भांडवल नाही हाती । मा मुक्ति कैंची ॥५॥
स्वप्नींचे निजधनें जाग्रतीं नोहे धर्म । ब्रह्माहमस्मि हेंही समाधान । सोलीव भ्रम ॥६॥
अभिमानाचिया स्थिती । ब्रह्मादिका पुनरावृत्ती । ऐसी वेदश्रुती । निश्चयो बोले ॥७॥
एका जनार्दनी एकपण अनादी । अहं आत्मा तेथे समुळ उपाधी ॥८॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग