वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ६. सार्थ अभंग २५०१ ते ३०००

संतोषे माउली आरुषा व

🙏 3. संत तुकाराम · ABH-077200 · अभंग क्र. २७९८

2798.
संतोषे माउली आरुषा वचनी । वोरसोनि स्तनी लावी बाळा ॥१॥
तैसे प्रेमळाचे अवघेचि गोड । पुरवितो कोड पांडुरंग ॥धृपद॥
सेवा करी साहे निष्ठुर उत्तरे । त्याचे वाहे बरे तेचि मनी ॥२॥
तुका म्हणे इच्छावसे खेळे खेळ । चिंता तै सकळ काही नेणे ॥३॥

अर्थ :
लहान मुलाच्या बोबड्या बोलण्याने त्याची आई फार संतुष्ट होते आणि प्रेमाने त्याला जवळ घेऊन त्याची इच्छा नसताना देखील त्याला स्तनाला लावते. त्याप्रमाणे पाडूरंगाच्या प्रेमळ भक्ताचे सर्व काही त्याला गोडच वाटते म्हणजे त्याचे वागणे बोलणे सर्व त्याला पाडूरंगाला गोड वाटते व तो त्या भक्ताचे सर्व लाड पूर्ण करतो. आई त्या मुलाची सेवा करते मुलगा कितीही निष्ठूर बोलला तरी ते सहन करते आणि त्याचे बरेच व्हावे अशीच संकल्पना मनात वाहात असते. तुकाराम महाराज म्हणतात, लहान मूल जर खेळायला गेले तर त्याला त्याच्या तहान भूकेची कसलीही चिंता नसते त्याची सर्व चिंता त्याच्या आईलाच असते अगदी त्याप्रमाणे भक्तांची सर्व पाडूरंगालाच असते.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग