जों जों धरसी वासना ।
2806.
जों जों धरसी वासना । तो तो नोहे रे उगाणा । पंढरीचा राणा । ध्यानामाजीं आणिक ॥१॥
हेंचि सर्व साधनांचे सार । नको व्युप्तत्तीचा भार । या वचनी निर्धार । धरी संतपायी ॥२॥
नको योगयाग तप । वाउगा मंत्र खटाटोप । येणे न धाये माप । जन्मजरा मृत्युचे ॥३॥
नको पडूं याचे भरी । वाचे म्हणे कृष्ण हरी । एका जनार्दनी निर्धारी । निष्पाप होसी तू ॥४॥
