वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ६. सार्थ अभंग २५०१ ते ३०००

कोठे देवा बोलो । तुम

🙏 3. संत तुकाराम · ABH-077380 · अभंग क्र. २७७३

2773.
कोठे देवा बोलो । तुम्हा भीड घालू गेलो ॥१॥
करावाया सत्वहाणी । भांडवलाची टांचणी ॥धृपद॥
दुर्बळा मागता । त्याच्या प्रवर्तला घाता ॥२॥
तुका म्हणे नाही । मज कळले ऐसे काही ॥३॥

अर्थ :
देवा कुठे तुमच्यासंगे मी बोलायला निघालो आणि तुम्हाला भीड घालायला निघालो आहे ? देवा मी तुमच्याशी बोलायला आणि भीड घालणे हे म्हणजे तुमचे सत्वहरण करण्यासारखेच होईल कारण तुमच्याकडे भांडवलाची फारच कमतरता आहे. देवा एखादया दुर्बळाने तुम्हाला काही मागणी मागितली तर तुम्ही त्याचा घात करण्यासाठी प्रवृत्त होता. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुम्ही असे विश्वासघातकी आहात हे मला यापूर्वी कळलेच नाही.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग