वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ६. सार्थ अभंग २५०१ ते ३०००

हुंदकी पिसवी हलवीता

🙏 3. संत तुकाराम · ABH-077056 · अभंग क्र. २७६७

2767.
हुंदकी पिसवी हलवीता दाढी । माळे मणी ओढी निंदेचेते ॥१॥
त्याचे फळ पाकी यमाचे ते दंड । घर केले कुंड कुंभपाकी ॥धृपद॥
क्रोध पोटी मांग आणिला अंतरा । भुंकोनि कुतरा जप करी ॥२॥
तुका म्हणे स्नान केले मळ मूत्रे । जेविली पितरे अमंगळे ॥३॥

अर्थ :
एखादा ढोंगी मनुष्य गोमुखीत म्हणजे जप करण्याच्या पिशवीत हात घालून माळ जपण्याचे सोंग करतो व काहीतरी जप करताना दाढी हालवत असतो परंतू तो माळ जपताना दुस-याची निंदा करण्याचेच विचार करत असतो. परंतू त्याचे फळ म्हणजे केवळ यमदंडच आहे आणि घोर कुंभीपाक नरक हेच त्याचे घर आहे. असा हा ढोंगी मनुष्य आपल्या अंत:करणात कामक्रोधरुपी मांगच आणतो आणि असा हा कुत्रा हुंगल्यासारखे जप करतो. तुकाराम महाराज म्हणतात, अशा ढोंगी मनुष्याने स्वत: तर मलमूत्राने तर स्नान केलेच परंतू त्याच्या पितरांना देखील त्याने मलमूत्रे आणि विष्ठाच खाऊ घालून अमंगल केले आहे असे समजावे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग