नेणपणे नाही केला हा
2803.
नेणपणे नाही केला हा बोभाट । आता आली वाट कळो खरी ॥१॥
आता बहु शीघ्र यावे लवकरी । वाट पाहे हरी भेटी देई ॥धृपद॥
समर्थाच्या बाळा करुणेचे भाषण । तरी त्याची कोण नांदणूक ॥२॥
तुका म्हणे बहु बोलिले बडिवार । पडिले अंतर लौकिकी ते ॥३॥
अर्थ :
देवा तुमच्यात व माझ्यात पिता-पुत्राचा संबंध आहे हे मला यापूर्वी माहीत नव्हते त्यामुळे मी या गोष्टीचा बोभाटा देखील केला नाही परंतु मला आता ही गोष्ट समजून आली आहे की आपण दोघामध्ये काय संबंध आहे त्यामुळे मी आता कोणतेही परमार्थिक गोष्ट पुत्राच्या हक्काने मागणार आहेत ही खरी वाट मला कळून आली आहे. त्यामुळे हे हरी तू लवकर शीघ्रतेने माझ्याकडे यावे मी तुझी वाट पाहत आहे तू लवकर मला भेट द्यावी. समर्थ व्यक्तीच्या बाळाला जर करुनतेचे भाषण करावे लागले तर त्या समर्थ व्यक्तीच्या किर्तीचा काय उपयोग आहे? तुकाराम महाराज म्हणतात देवा यापूर्वी लोकांकडून मी तुमची खूप कीर्ती ऐकले आहे परंतु तुमच्या असे वागणे म्हणजे लौकिकात अंतर पडण्यासारखे होत आहे.
